महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घसरणीच्या प्रवासात तेजीची झुळूक

05:39 AM Apr 17, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई :

Advertisement

चालू आठवडय़ात पहिल्या दिवशी सोमवारी कोरोनाच्या संकटाच्या वाढत्या भीतीने बाजार
घसरला होता, त्याच्या दुसऱया दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजाराला
सुट्टी होती. त्यामुळे बाजार नेहमीप्रमाणे बुधवारी सुरु झाला. या दिवशी बाजाराला आवश्यक
तेवढी मजल मारण्यात यश मिळाले नाही. परंतु गुरुवारी मात्र ही उणिव भरुन काढत मागील
काही दिवसांपासून सुरु असणारी घसरणीची मालिका काहीशी खंडीत केल्याचे पाहावयास मिळाले
आहे.

Advertisement

दिवसभरात जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणात आर्थिक , ऊर्जा
आणि वीज कंपन्यांच्या समभागांनी नफा कमाई केल्याचे दिसून आले. यात दिवसअखेर सेन्सेक्स
222.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 30,602.61 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय
शेअर बाजारातील निफ्टी 67.50 अंकांनी वधारुन 8,992.80 वर बंद झाला आहे. परंतु दिवसभरात
सेन्सेक्स 223 अंकांनी वधारला तर बीएसईमधील 30 कंपन्यांच्या क्यवहरात सेन्सेक्स
784 अंकांनी चढउतार करत राहिला आहे.

प्रमुख कंपन्यांपैकी एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक 6 टक्क्मयांनी
वधारले आहेत. तर आयसीआयसीआय बँक, टायटन, लार्सन ऍण्ड टुब्रो सन फार्मा आणि नेस्ले यांचे
समभागात तेजी राहिली होती. मात्र एचसीएल टेक, कोटक बँक, टेक महिंद्रा, हिरो मोटो कॉर्प
आणि इन्फोसिस यांचे समभागांना योग्य कामगिरी करण्यात अपयश आल्याचे पहावयास मिळाले आहे.
जागतिक बाजारांच्या तुलनेत देशातील बाजारात तेजीची झुळूक पहावयास मिळाली आहे. कारण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील बाजारापेठा ठप्प आहेत. तर आर्थिक घडी सावरण्यासाठी
सर्वच देश प्रयत्न करीत असून यामुळे शेअर बाजारात दबावाचे वातावरण असल्याचे तज्ञांनी
म्हटले आहे.

तिमाही आकडेवारी

मार्च तिमाहीचे नफा कमाईचे आकडेवारी सादर केली जात आहे, परंतु
कोणतिही कंपनी आगामी काळासाठीचे ध्येय किंवा उत्पन्नांसंदर्भातील अंदाज व्यक्त करत
नाहीत. यात नुकत्याचे विप्रोने आपला अहवाल सादर केला आहे. तसेच अन्य कंपन्यांही करणार
असल्या तरी उद्योगजगतावरील दबावाचे ढग कायम राहणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Advertisement
Next Article