ग्लोबल विकासावर जगभरातील सीईओ नाराज
ग्लोबल कंसल्टन्सी फर्म पिडब्लूसीचा अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ दावोस
जगभरातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या निरीक्षणामधून ग्लोबल पातळीवरील विकासदर संदर्भात निराशाजणक मत असल्याची माहिती आहे. ग्लोबल कंसल्टन्सी फर्म पिडब्लूसीच्या सर्वेक्षणानुसार प्रथमच 53 टक्क्यांनी विकासात घट होणार असल्याचे मत मांडले आहे.
मागील वर्षात हा आकडा 29 टक्के होता. तर चालू सर्वेक्षणात 83 देशांतील 1,581 सीईओचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे. यांच्या मतानुसार 22 टक्क्यांनी विकास वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील वर्षात सर्वेक्षणात सीईआंsची संख्या 42 टक्के होती. स्वित्झलँडमध्ये सुरु असणाऱया दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठकीच्या पहिल्याच दिवशी हा सर्वे सादर करण्यात आला आहे.
अर्थव्यवस्थेत मुख्या कंपन्या असणाऱया देशांमध्ये चीनमधील सीईओंनी मागील वर्षाच्या तुलनेत विकासात वाढ झाल्याचे मत मांडले आहे. तर त्यांच्या कंपन्यांची महसूल कमाई वाढणार असल्याचा विश्वास आहे व्यक्त केला आहे.
भारतीय सीईओंचे मत
सर्वेक्षणात भारतामधील 52 टक्के सीईआंsचे मत आहे की जगाचा आर्थिक विकासदर घटणार असल्याचे भाकित केले आहे. 2018 मध्ये ग्लोबल आर्थिक विकासदर वाढण्याचे अनुमान व्यक्त केले होते. याच वेळी जगातील 57 टक्के सीईओंनी विकासदर वाढण्याचा विश्वास व्यक्त केला होता.