For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅस सिलेंडर वापरताना

06:00 AM Sep 30, 2021 IST | Tarun Bharat Portal
गॅस सिलेंडर वापरताना
Advertisement

गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याच्या दुर्घटना अलीकडील काळात वारंवार घडताना दिसतात. यामध्ये महिलांचा बळी जाण्याचे प्रमाण अधिक आहे. वास्तविक, गॅस सिलिंडर वापराबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण ते महागात पडते. म्हणूनच गॅस सिलिंडर वापरातील प्राथमिक गोष्टी तरी किमान अमलात आणायला हव्यात.

Advertisement

  • सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे सिलिंडरचा रेग्युलेटर योग्य प्रकारे बसला आहे की नाही तपासा. त्यातून गॅस लिकेजचा बारीक आवाज किंवा वास येत असल्यास तात्काळ कंपनीला कळवा.
  • गॅस सिलेंडर नेहमी उघडया जागी ठेवावे, कपाटासारख्या बंदीस्त जागी ठेवू नये.
  • गॅस सिलेंडरच्या बाजूला वर्तमानपत्राची रद्दी, जुने कपडे, प्लॅस्टीकच्या पिशव्या ठेवू नयेत.
  • गॅस सिलेंडरच्या बाजूला रॉकेल, पेट्रोल यासारखे ज्वालाग्रही पदार्थांचे डबे ठेवू नयेत.
  • गॅस सिलेंडरच्या बाजूला ओलसरपणा, दमटपणा किंवा जास्त उष्णता निर्माण होणार नाही याची काळजी घ्याची.
  • गॅस सिलेंडर वापरात नसेल तर त्याची सेफ्टी कॅप त्यावर लावून ठेवावी.
  • सिलेंडर ठेवण्यासाठी चाकाच्या ट्रॉली वापरू नयेत.
  • सिलेंडरचा रेग्युलेटर व्यवस्थित बसला आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यावर साबणाचे पाणी टाकून बुडबुडे येतात का ते पहावे.
  • गॅस पुरवठा करणारी रबरी नळी दीड मीटरपेक्षा जास्त लांब असू नये.
  • या नळीला कोठे चिरा पडलेल्या नाहीत ना हे वारंवार पहावे.
  • या नळीवर उकळते पाणी किंवा गरम तेल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गॅसची शेगडी सिलेंडरपेक्षा उंच असावी.
  • गॅसची शेगडी जमिनीपासून कमीत कमी दोन फुटांवर असावी.
  • शेगडीच्या मागच्या भिंतीवर कपाटे असू नयेत.
  • शेगडीचा बर्नर पितळी असावा.
  • क्रोमियम प्लेटींगपेक्षा स्टेनलेस स्टीलची शेगडी जास्त टिकाऊ असते.
  • स्वयंपाकाची सर्व पूर्व तयारी करूनच मग गॅस पेटवावा.
  • स्वयंपाकासाठी सपाट बुडाची भांडी वापरल्यास गॅसची बचत होते.
Advertisement
Tags :

.