For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅलेक्सी नोट-10 दोन मॉडेलसह सादर

08:44 PM Jan 21, 2020 IST | Tarun Bharat Portal
गॅलेक्सी नोट 10 दोन मॉडेलसह सादर
Advertisement

लाँचिंग ऑफरमध्ये कंपनीकडून भारतात 5 हजारपर्यंत सवलत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दक्षिण कोरियातील टेक कंपनी सॅमसंगकडून भारतीय बाजारात प्रीमियम फ्लॅगशिफ स्मार्टफोन गॅलेक्सी नोट-10 लाइटचे सादरीकरण करण्यात आले आहे. सदरचा फोन दोन मॉडेलमध्ये सादर केले आहे. यांची सुरुवातीची किंमत 38,999 रुपये असून फोनची विक्री येत्या 2 फेबुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती  कंपनीने दिली आहे. भारतात स्मार्टफोन सादर करण्या अगोदर सॅमसंग गॅलेक्सी एस 10 लाइटचे जागतिक पातळीवरही सादर करण्यात आले आहे.

Advertisement

फोनमधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनला एस-पेन सपोर्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा पेन रिमोट कंन्ट्रोलप्रमाणे नियंत्रणाचे काम करणार आहे. टेक्स्ट एक्स्पोर्ट फिचरची सोय आहे. यात रिडेबल टेक्स्टमध्ये कन्वर्ट अक्षर बदलतात, तर कॉपी-पेस्ट-शेअर करण्यात येते असल्याची माहिती दिली आहे. 

फोनमधील सुविधा

डिस्प्ले  : आकार 6.7 इंच, फुल एचडी

ओएस : अँड्राँइड-10

प्रोसेसर : 10 एनएम एक्सीनोस 9810 ऑटो-कोर

रॅम : 6जीबी/8 जीबी, स्टोरेज 128 जीबी

कॅमेरा : 12 एमपी-फ्रन्ट कॅमेरा-32एमपी

बॅटरी : 4500 एमएएच क्षमतेची

Advertisement
Tags :

.