महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुप्तधनाचे आमिष दाखविणारा सीरियल किलर

06:22 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

3 वर्षांत तेलंगणा, आंध्र, कर्नाटकात 11 हत्या

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तेलंगणाच्या नागरकुरनुल जिल्ह्यात पोलिसांनी एका ‘सीरियल किलर’ला अटक केली आहे. या सीरियल किलरने तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात 11 जणांची हत्या केली होती. रामती सत्यनारायण (47 वर्षे) असे या आरोपीचे नाव असून त्याने लोकांना गुप्तधनाचे आमिष दाखवून ठार केले होते. पूजा करून हे गुप्तधन समोर आणणार असे सांगून तो लोकांना विश्वासात घेत होता.

संबंधित व्यक्तीकडून पैसे घेत होता किंवा त्याची जमीन तो स्वत:च्या नावावर करवून घेत होता. मग संबंधित व्यक्तीला निर्जन स्थळी नेत त्याला अॅसिड किंवा अन्य विष प्राशन करण्यास भाग पाडत होता. पीडित व्यक्ती बेशुद्ध पडताच आरोपी दगडाने त्याचे डोके ठेचायचा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

2020 पासून आरोपीने हे गुन्हे सुरू केले होते. परंतु प्रत्येकवेळी तो पोलिसांच्या तावडीत सापडण्यापासून बचावला होता. आतापर्यंत आरोपीने महिलांसमवेत 11 जणांचा जीव घेतला आहे. सध्या तेलंगणा आणि आंध्रप्रदेश तसेच कर्नाटकातील 8 हत्यांप्रकरणांमधील त्याच्या भूमिकेचा खुलासा झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

एका महिलेचा पती हैदराबादमधून सत्यनारायणला भेटण्यासाठी नागरकुरनूल येथे गेला होता. संबंधित इसम पाच दिवसांनंतरही घरी न परतल्याने महिलेने पोलिसांकडे धाव घेतली होती. या महिलेने तसेच अन्य कुणीच सत्यनारायणला पाहिले नव्हते. नागरकुरनूलमध्ये तपास केला असता सत्यनारायणचे वर्तन संशयास्पद आढळून आले. अधिक चौकशी केली असता सत्यनारायणने स्वत:चे गुन्हे कबुल केले आहेत. सत्यनारायणने संबंधित लोकांना पवित्र पेयाच्या नावाखाली अॅसिड प्राशन करायला देत त्यांची हत्या केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article