गुगलकडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा होणार बंद
ऑनलाईन टीम / मुंबई :
गुगलकडून रेल्वे स्थानकांवर दिली जाणारी मोफत वाई-फाय ची सेवा आता बंद करण्यात येणार असल्याचे संकेत गूगलकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात ही सेवा आता मिळणार नाही, हेच स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गूगलने अनेक देशांमध्ये फ्री वाय-फाय सेवा दिली होती. भारतातही ही सेवा रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करुन देण्यात आली होती. मुंबईत अनेक स्थानकांत ही सेवा सुरुही आहे. मात्र, गूगलच्या नव्या निर्णयामुळे ही सेवा आता बंद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोफत वाय-फायचा लाभ मिळणार नाही.
गुगल कडून रेल्वे स्थानकांवर वाई-फाय ची मोफत सेवा पाच वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली होती. ही सेवा आता मिळणार नाही. गूगलने मोफत वायफाय सेवा पुरवणारा गुगल स्टेशन हा प्रकल्प भारतासह अन्य देशांमध्येही बंद करत असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
भारतासह नायजेरिया, थायलंड, फिलिपाइन्स, मेक्सको, इंडोनेशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांत गूगलकडून मोफत वाय-फाय सेवा पुरविण्यात येत होती. आता तेथील सेवाही बंद केली जाणार आहे.