महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणतंत्र समारंभाला बायडेन नाहीत

06:22 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

आगामी गणतंत्रदिन समारंभाला अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन येऊ शकणार नाहीत, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. त्यांनी प्रमुख अतिथी म्हणून यावे, असा भारताचा प्रयत्न होता. भारताने त्यांना तसे आमंत्रण दिले आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी काही काळापूर्वी केले होते.

Advertisement

त्यांनी येथे येण्याचे ठरविले असते, तर त्यांच्या भारत दौऱ्याला जोडूनच ‘क्वाड’ परिषदही आयोजित करण्याची भारताची योजना होती. ही परिषद 27 जानेवारीला घेतली जाऊ शकते, असे भारताने कळविले होते. तथापि, भारतात होणारी क्वाड परिषद 2024 मध्ये घेण्यात येईल, असे नंतर ठरविण्यात आले होते. परिणामी, बायडेन यांचा संभाव्य भारत दौरा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article