महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानोलीत पुन्हा शॉर्टसर्किटमुळे आग

05:20 AM Mar 06, 2021 IST | Abhijeet Khandekar
खानोली : वीज अधिकाऱयांना जाब विचारताना खानोली ग्रामस्थ. देवराज सावंत
Advertisement

 काजू कलमे बेचिराख : ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल : ‘स्पेसर्स’ बसविण्याचे आश्वासन

Advertisement

वार्ताहर / खानोली:

Advertisement

खानोली-सडा येथील आंबा, काजूच्या बागेला गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. वाऱयामुळे आगीने रौदरुप धारण करून एका घराला विळखा घातला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सदर घर आगीपासून वाचले.  मात्र, यात काजूच्या कलमांचे मोठे नुकसान झाले. सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

या आगीत मदन सावंत, विद्याधर प्रभू, प्रदीप सावंत, संदीप सावंत, श्रीधर गोवेकर यांचे नुकसान झाले. खानोली सडा येथील आंबा, काजूच्या बागेला शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचे प्रकार सुरूच असूनही वीज वितरणकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पहाटे लागलेल्या आगीबाबत श्रीमंत मानवर यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर वेंगुर्ले पोलीस स्टेशनशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी वेंगुर्ले पालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. माळरानावरील वाऱयामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीने श्रीमंत मानवर यांच्या घराला विळखा घातला. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नामुळे घराचे नुकसान टळले. मात्र, काजू कलमांचे मोठे नुकसान झाले.

वीज वितरणच्या अधिकाऱयांना विचारला जाब 

या प्रकारामुळे संतप्त खानोली ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱयांना घटनास्थळी येण्यास सांगितले. मात्र, वीज वितरणचे अधिकारी घटनास्थळी येण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वीज वितरणचे अभियंता खटावकर यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी येण्यास सांगितले. त्यानंतर वीज वितरणचे अधिकारी तोंडले व खानोली वायरमन अजित पारकर, धोंड घटनास्थळी आले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. गेल्या चार वर्षांपासून वीज वितरणच्या अनागोंदी कारभारामुळे खानोली येथील आंबा, काजू बागांमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात आंबा, काजूच्या कलमे बेचिराख होऊन बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. गतवर्षी वीज अधिकाऱयांनी सदर वीज वाहिन्यांवर स्पेसर्स बसविण्याचे आश्वासन देऊनही कार्यवाही का झाली नाही? याबाबत जाब ग्रामस्थांनी विचारला.

यावेळी सरपंच प्रणाली खानोलकर, उपसरपंच सुभाष खानोलकर, ग्रामसेवक एस. एस. अंधारी, पोलीस पाटील धोंडू खानोलकर, पांडुरंग सावंत, राजेश सावंत, सागर सावंत, नाना कोळेकर, रामा कोळेकर, ग्रा. पं. कर्मचारी दीपक खानोलकर, प्रल्हाद हळदणकर, सिद्धेश हळदणकर, प्रकाश खरात, शुभम सावंत, प्रथमेश सावंत, सुनील सावंत, संजय गोवेकर, वैभव कोळेकर आदी उपस्थित होते.

आठ दिवसांत स्पेसर्स बसविणार!

ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे वीज वितरणचे अधिकारी तोंडले यांनी सदर वीज वाहिन्यांवर येत्या आठ दिवसांत स्पेसर्स बसविणार, असे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले. 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article