महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खबरदारीतूनच गणेशाचे स्वागत करूया!

05:58 AM Aug 18, 2020 IST | Abhijeet Khandekar
मालवण : शहरातील गणेशोत्सव नियोजन बैठकीत बोलताना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर. बाजूला इतर मान्यवर.
Advertisement

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन

Advertisement

मालवण पालिकेतर्फे गणेशोत्सव नियोजन जाहीर

Advertisement

प्रतिनिधी / मालवण:

मालवण पालिकेने गणेश चतुर्थीनिमित्त आपले नियोजन जाहीर केले आहे. यासाठी नगरसेवक, पोलीस, महसूल, आरोग्य, एसटी, शाळा, वीज वितरण आणि व्यापारी यांची संयुक्त बैठक नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पालिकेचे नियोजन जाहीर करण्यात येऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. पालिकेचे नियोजन 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आले आहे.

उपनगराध्यक्ष राजन वराडकर, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, एसटी आगार व्यवस्थापक बोधे, वीज वितरणचे भुजबळ, व्यापारी संघाचे प्रतिनिधी अरविंद सराफ, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, तृप्ती मयेकर, गणेश कुशे, पूजा सरकारे, पंकज सादये, पूजा करलकर, शीला गिरकर, मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, ममता वराडकर, रिक्षा संघटना अध्यक्ष कद्रेकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महेश अंधारी, सरदार ताजर उपस्थित होते.

फुलपत्री बाजार नाटय़गृह परिसरात

भाजी मार्केटमध्ये भरणारा गणपतीसाठी आवश्यक फुलपत्री बाजार नाटय़गृह परिसरात भरणार आहे. यात नेरुरकर गल्ली, सिंडिकेट बँक गल्ली, सारस्वत बँक गल्ली या तीन गल्लींचा समावेश आहे. विक्रेत्यांनी रस्तादुतर्फा न बसता एका बाजूने भाजी विक्रीसाठी बसणे आवश्यक आहे. फळ विक्रेत्यांसाठी भाजी मार्केट बिल्डिंग समोरील मोकळ्य़ा जागेत सोय करण्यात आलेली आहे. घाट माथ्यावरून येणाऱया भाजी विक्रेत्यांना शहरात येण्यास बंदी असून भाजीला बंदी नाही.

बाजारपेठेत फक्त दुचाकी, रिक्षांना प्रवेश

भरड येथून बाजारात येणाऱया रस्त्यावर फक्त दुचाकी आणि तीनचाकी गाडय़ांना परवानगी असणार आहे. भरड येथून फोवकांडा पिंपळ या मार्गावर दुहेरी वाहतूक करण्यासाठी परवानगी असेल. फोवकांडा पिंपळ ते बंदर जेटी हा मार्ग सुद्धा दुहेरी वाहतूक करण्यासाठी खुला असणार आहे. बाजारपेठ नेरुरकर गल्ली, सिंडिकेट बँक गल्ली, विजया बेकरी ते भंडारी हायस्कूल गल्ली वाहतुकीसाठी बंद असणार आहे. भंडारी हायस्कूल, बंदर जेट्टी येथे पार्किंगची सुविधा असणार आहे.

गणपती विसर्जन रात्री आठपर्यंतच

विसर्जनासाठी रात्री 8 पर्यंत परवानगी असेल. बाजारपेठ येथे फटाके वाजविण्यास बंदी असणार आहे. फक्त बंदर जेटी येथे फटाके वाजविण्यास परवानगी मिळणार आहे. लहान आणि ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीत येण्याचे टाळावे. आपत्कालीन ग्रुप, मालवणतर्फे बंदर जेटी येथे या वर्षीही मोफत गणेश विसर्जनाची सोय करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दामोदर तोडणकर यांनी दिली. व्यापारी संघ, मालवणतर्फे भरड ते स्टेट बँकेपर्यंत स्पीकरद्वारे अनाउन्समेंट आणि गणेश आरतीची सोय असेल. वाद्य परवानगी नसल्याने एक धार्मिक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

वाहतूक मार्ग व पार्किंग व्यवस्था

सागरी महामार्ग - खासगी बस / ट्रक / अवजड वाहने थांबविणे व पार्किंग करणे, नाटय़गृह आवार-खासगी चारचाकी वाहने पार्क करणे, भंडारी हायस्कूल पटांगण - दुचाकी वाहने व रिक्षा पार्क करणे. टोपीवाला हायस्कूल - खासगी चारचाकी वाहने, टेम्पो इ. पार्क करणे. बांगीवाडा - सहा आसनी रिक्षा / टेम्पो / कार पार्क करणे. सारस्वत बँक - एक बाजू - मोटर सायकल पार्किंगसाठी फक्त. मशीद गल्ली - सायकल / पार्किंगसाठी फक्त. जेट्टी परिसर - सारस्वत बँकेकडील अतिरिक्त रिक्षांकरिता पार्किंग व्यवस्था. सुबोध मेडिकल ते भाजी मार्केट रस्ता - तीन आसनी रिक्षा व हातगाडय़ांसाठी फक्त. भंडारी हायस्कूल सभागृह- सर्व वाहनांना प्रवेश बंद फक्त सायकल मशीद गल्लीपर्यंत. हॉटेल सागर किनारा रस्ता - एक बाजू रिक्षा थांबा, सारस्वत बँक-रिक्षा थांबा. बॉम्बे टेक्सटाईल्स- उजवीकडे फक्त / सायकलसाठी प्रवेश, रिक्षा / चारचाकी वाहने प्रवेश बंद. नेरुरकर गल्ली - सर्व वाहनांसाठी बंद. धक्का जेट्टी- सर्व वाहनांसाठी वाहनतळ. भरड नाका ते स्टेट बँक - बाजारपेठ रस्ता. सर्व प्रकारच्या वाहनास पार्किंग करणे बंद आहे. खासगी आराम गाडय़ांसाठी सागरी महामार्ग येथे वाहनतळ असेल.

पोलीस कर्मचारी नियुक्ती

सागरी महामार्ग जंक्शन, एसटी. स्टॅण्ड, भरड - तारकर्ली नाका, भरड नाका, बॉम्बे टेक्सटाईल्स नाका, सकपाळ नाका - सुबोध मेडिकल, सारस्वत बँक नाका. जेटी नाका, फोवकांडा पिंपळ नाका, भंडारी हायस्कूल सभागृह नाका, कोळंब - सागरी महामार्ग नाका याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.

खबरदारीतूनच गणेशाची आराधना!

मालवण शहरात भाज्या, फळे जादा भावाने विकत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी गणपतीच्या खरेदीसाठी गर्दी करू नये. चार दिवस अगोदरच सामान खरेदी करावे. व्यापारी यांनी सुद्धा जास्तीत जास्त घरपोच सेवा देण्यावर भर द्यावा. मालवणात सध्या कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, क्वारंटाईन असताना बाहेर फिरणाऱयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चाकरमान्यांचे मालवणमध्ये स्वागत आहे. त्यांनी शासनाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. धार्मिक इच्छा असूनही आपल्या कुटुंबाच्या पर्यायाने मालवणच्या सुरक्षिततेसाठी गावी न आलेल्या चाकरमान्यांचे मनापासून आभार मानत आहे, असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article