‘क्राइम आज कल सीझन 2’मध्ये प्रतीक गांधी
गुन्ह्यांच्या विरोधात लोकांना करणार जागरुक
टीव्हीवर क्राइम पेट्रोल आणि सावधान इंडिया यासारखे कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. यात प्रत्यक्षात घडलेल्या गुन्ह्यांवर आधारित कहाण्या दाखविल्या जातात. आता अशा कार्यक्रमांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्थान देण्यात येत आहे. अमेझॉन मिनीटीव्हीने क्राइम आज कलच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली असून याचे सूत्रसंचालन प्रतीक गांधी करत आहे. या शोचा ट्रेलरही जारी करण्यात आला आहे.
गुन्ह्यांच्या खऱ्या कहाण्यांनी प्रेरित या सीरिजमध्ये युवांच्या दृष्टीकोनातून गुन्हेगारी प्रकरणांचा तपास दाखविला जात आहे. हा शो समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रकाश टाकणे आज्ण गुन्ह्यांच्या घटनांबद्दल प्रेक्षकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यात आला आहे.
प्रेक्षक स्वत:ला कशाप्रकारे सुरक्षित ठेवू शकतात हे प्रतीक गांधी याचे सूत्रसंचालन करत सांगणार आहे. शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या कहाण्या दाखविण्यात येणार आहेत. प्रत्येक एपिसोडच्या अखेरीस क्राइममागील उद्देश आणि गुन्हेगाराची ओळख पटणार आहे.
क्राइम आज कल वेबसीरिजचा दुसरा सीझन अमेझॉन मिनीटीव्हीवर पाहता येणार आहे. ऑप्टिमिस्टिक्स एंटरटेन्मेंटकडून निर्मित या शोचे दिग्दर्शन सुब्बू अय्यर यांनी केले आहे. या वेबसीरिजचा पहिला सीझन 24 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. याच्या 10 एपिसोड्समध्ये वेगवेगळ्या कहाण्या दाखविण्यात आल्या आहेत.