For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोळी म्हणावे की लांडगा...

06:16 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
कोळी म्हणावे की लांडगा
Advertisement

कोळी हा कीटक आपले जाळे विणतो आणि त्यात अडकलेल्या छोट्या किटकांची शिकार करतो, याची आपल्याला माहिती आहे. आपल्या घरातही (ते अत्याधुनिक असले तरी) जेथे आपले फारसे लक्ष नसते, किंवा ज्या भागाची स्वच्छता नेहमी केली जात नाही, तेथे कोळ्याचे जाळे धरलेले पहावयास मिळते.

Advertisement

तथापि, वूल्फ स्पायडर किंवा लांगड्याकोळी नावाचा कोळी असे जाळे तयार करत नाही. तो कोळी असला तरी, लांडग्याप्रमाणे भक्ष्यावर झडप घालून त्याची शिकार करतो. त्यामुळेच त्याला असे नाव पडले आहे. ही कोळ्यांची एक प्रजाती आहे आणि या प्रजातीत भिन्न भिन्न प्रकारचे कोळी आहेत. सामान्य कोळ्यांपेक्षा त्यांचा धावण्याचा वेग बराच जास्त असतो. त्यांचे आकार अर्ध्या सेंटीमीटरपासून तीन सेंटीमीटरपर्यंत आकाराचे ते असू शकतात. या प्रजातीमध्ये अडीच हजाराच्या आसपास प्रकार आहेत, असे संशोधकांना आढळून आले आहे.

असा कोळी आपल्या घरात किंवा आपल्या जवळ असलेला आपल्याला दिसला, तरी त्याला चुकूनसुद्धा मारु नये अशी सूचना संशोधकांनी केली आहे. कारण एका कोळ्याला अशा प्रकारे मारल्यास त्याच्या पाठीवर बसलेले अनेक छोटे कोळी बाहेर पडतात आणि परिसरात पसरतात. त्यामुळे त्यांची परिसरातील संख्या वाढते. कारण हे कोळा आपली बाळे आपल्या पाठीवर घेऊनच संचार करत असतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.