कोळशाच्या किमती वाढवण्याचा विचार
07:30 AM Sep 24, 2021 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : कोळसा क्षेत्रातील कोल इंडिया लिमिटेडने येणाऱया काळात कोळशाच्या किमती वाढवण्याचा इशारा दिला आहे. सदरची कोळशाची दरवाढ ही टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याची माहिती चेअरमन प्रमोद अग्रवाल यांनी दिली आहे. आशियातील कोळशाचे दर सध्या सर्वोच्च स्तरावर आहेत. दरवाढ एकदम न करण्याचे चेअरमननी स्पष्ट केले असून यापूर्वी समभागधारकांशी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत दरवाढीबाबत चर्चा केली जाणार असल्याचेही प्रमोद अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article