महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोरोना महामारीतही विक्रमी विदेशी गुंतवणूक

02:02 AM Aug 09, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

22 अब्ज डॉलर्सचा उच्चांकी एफडीआय भारतात : विदेशी कंपन्यांनी देशावर दर्शविला विश्वास

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था मंदावली असली तरीही भारत थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यास यशस्वी ठरला आहे. महामारीच्या काळात भारतात विक्रमी 22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) एका ऑनलाईन सोहळय़ात ही माहिती दिली आहे.

भारताची एफडीआय व्यवस्था जगभरात सर्वाधिक मुक्त आहे. भारताने सातत्याने मोठय़ा प्रमाणावर विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे. महामारीच्या काळातही भारतात 22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक झाली असून यातील सुमारे 98 टक्के स्वयंचलित पद्धतीने दाखल झाल्याचे कांत म्हणाले.

व्यवसायसुलभता

जागतिक व्यवसायसुलभता मानांकनात भारताने सुमारे 79 अंकांची झेप घेतली आहे. चालू वर्षात भारत पहिल्या 50 देशांमध्ये स्थान मिळविण्यास यशस्वी ठरेल अशी अपेक्षा आहे. तसेच पुढील वर्षात आम्ही पहिल्या 3 देशांमध्ये असू, असे उद्गार कांत यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना काढले आहेत.

जियोचा मोठा वाटा

रिलायन्स समुहातील जियो प्लॅटफॉर्म्सने एप्रिलपासून सुमारे 1.5 लाख कोटी रुपये जमविले आहेत. जियो प्लॅटफॉर्म्सने अनेक जागतिक कंपन्यांना 32.94 टक्के हिस्सेदारी विकली आहे. फेसबुक या समाजमाध्यम कंपनीने 9.99 टक्के हिस्स्यासाठी 43,574 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. गुगलनेही 7.7 टक्के हिस्सेदारीसाठी 33,737 कोटींची गुंतवणूक केली आहे.

चिनी कंपन्यांबाबत टाळाटाळ

भारतात सातत्याने विदेशी गुंतवणूक वाढत असतानाच चीनमधून येणाऱया गुंतवणुकीच्या प्रस्तावाची विशेष छाननी केली जात आहे. एप्रिलमध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या नियमांच्या अंतर्गत भारताला सीमा लागून असलेल्या देशांच्या कंपन्यांना गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. गृह मंत्रालयाकडून सुरक्षाविषयक मंजुरी मिळविण्याची प्रतीक्षा सुमारे 200 चिनी कंपन्या करत आहेत. चिनी कंपन्या संकटाचा अनुचित लाभ उचलू पाहत असल्याचा आरोप आहे.

पहिल्या 10 देशांमध्ये भारत

युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटनुसार दक्षिण आशियात भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक लवचिक अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ शकते. 2019 मध्ये थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त करणाऱया आघाडीच्या देशांमध्ये भारत 9 व्या स्थानावर होता. 2018 मध्ये भारताला 12 वे स्थान मिळाले होते. भारत सरकार व्यापक स्तरावर मुलभूत सुधारणांसाठी सक्षम असल्याचा विश्वास देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेशी गुंतवणुकदारांना आमंत्रित केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article