कोरोना बाधितांची संख्या 3 हजार पार
जिल्हय़ात 73 नवे रुग्ण, आणखी दोघांचा मृत्यू
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सोमवार सायंकाळपासूनच्या 24 तासात 73 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येने 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, रत्नागिरी व गुहागर तालुक्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 107 झाली आहे.
जिल्हयात ऍन्टिजेन चाचणीत 64 नवे रुग्ण आढळले असून त्यात रत्नागिरी तालुक्यातील 28, दापोली 22, संगमेश्वर 1 व घरडा घरडा रुग्णालयातील 13 जणांचा समावेश आहे. तर आरटीपीसीआर चाचणीत रत्नागिरीत 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हय़ातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3018 इतकी झाली.
रत्नागिरी तालुक्यातील 35 वा बळी
रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण वाढले असून मंगळवारी पाली येथील 40 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. तालुक्यातील हा कोरोनाचा 35 वा बळी आहे. त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील काजुरी येथील 42 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. गुहागर तालुक्यातील हा चौथा कोरोना बळी आहे. तर कोरोनामुळे जिल्हय़ातील मृत्यूंची संख्या 107 झाली आहे.
आणखी 18 जण बरs
मंगळवारी आणखी 18 जण कोरोना उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 8, कामथे 1, समाजकल्याण रत्नागिरी 6, घरडा, खेड 3 येथील तिघांचा यात समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1865 झाली आहे.
एकही अहवाल प्रलंबित नाही
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 22 हजार 358 नमुने तपासण्यात आले त्यातील 3018 अहवाल पॉझिटिव्ह तर 19 हजार 328 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेमध्ये एकही अहवाल प्रलंबित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.