For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोरोनामुक्तांच्या संख्येत भारत जगात अव्वल

12:16 PM Sep 21, 2020 IST | Abhijeet Khandekar
कोरोनामुक्तांच्या संख्येत भारत जगात अव्वल
Advertisement

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

Advertisement

कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत भारत जगात अव्वल स्थानी आहे. भारतात आतापर्यंत 54 लाख 87 हजार 580 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामधील 43 लाख 96 हजार 399 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर ही दिली आहे.

भारतात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जगात 19 टक्के आहे. भारतानंतर कोरोनामुक्तांच्या संख्येत 18.70 टक्क्यांसह अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेनंतर 16.90 टक्क्यांनी ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो. त्यानंतर रशिया 4 टक्के आणि दक्षिण आफ्रिकेचा 2.60 टक्के असा रिकव्हरी रेट आहे.

Advertisement

जगभरात आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 43 हजार 024 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 कोटी 28 लाख 35 हजार 563 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.