For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे थिएटर्स, मल्टिप्लेक्सवर 'या' तारखेपर्यंत राहणार निर्बंध

01:33 PM Mar 17, 2021 IST | Tarun Bharat Portal
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे थिएटर्स  मल्टिप्लेक्सवर  या  तारखेपर्यंत राहणार निर्बंध
करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सवर 31 मार्चपर्यंत निर्बंध
Advertisement

कोरोनाचा प्रसार महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Advertisement

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी देशातील मॉल्स, थिएटर्स, हॉटेल्स, लग्न समारंभ यासरख्या अनेक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई पालिकेच्या अधिकृत ट्विटरवर याविषयी काही नियम जारी करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता ५० टक्के क्षमतेसह थिएटर्स सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये मॉल्स, थिएटर्स, हॉटेल्स, कार्यलयात मास्क नसल्यास प्रवेश दिला जाणार नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक आहे.

Advertisement

Advertisement

.