For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘कोरोना’ची धास्ती; शेअर बाजार गडगडला

08:42 PM Jan 27, 2020 IST | Tarun Bharat Portal
‘कोरोना’ची धास्ती  शेअर बाजार गडगडला

सेन्सेक्स 458 अंकांनी तर निफ्टीत 129 अंकांची घसरण

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चीननंतर जगभरातील बऱयाच देशात कोरोना विषाणूची संशयास्पद प्रकरणे समोर आल्यानंतर याची भीती शेअर बाजारामध्येही पाहायला मिळाला. या भीतीमुळे जोखमीच्या मालमत्ता मागणीत घट झाली असून, अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापूर्वी गुंतवणूकदार संघटनेकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. त्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 458.07 अंकांनी (1.10 टक्के) घसरत 41155.12 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 129.25 अंकांनी (1.06 टक्के) घसरून 12119 अंकांवर स्थिरावला.

Advertisement

कोरोना विषाणू जागतिक वित्तीय बाजारावर प्रभाव टाकत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत सुस्तीची भीती वाढत आहे. भारतामधील गुंतवणूकदार जागतिक बाजारातील विक्रीच्या दबावात असून, पुढील आढवडय़ात सादर होणाऱया अर्थसंकल्पापूर्वी साधव पवित्रा घेत आहेत, असे जियोजित फायनान्स सर्विसेसचे प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला असून, वित्तीय आणि धातू क्षेत्राला विक्रीचा त्रास सोसावा लागला. फक्त काही औषधनिर्माता कंपन्यांचे समभाग तेजी राहिले तर मुंबई शेअर बाजाराचा स्मॉलपॅप निर्देशांक तेजीच्या स्तरावर राहिला, असे एलकेपी सिक्युरिटीजचे एस. रंगनाथन म्हणाले.

Advertisement

सेन्सेक्सच्या घसरणीमध्ये फायनान्स क्षेत्राचा मोठा हात होता. एचडीएफसीचे समभाग 2.51 टक्के तर मोर्टेज लेंटर एचडीएफसीचे 2.25 टक्के घसरले. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या समभागात 2.42 टक्क्यांची घसरण नोंद झाली. मुंबई शेअर बाजारातील धातू निर्देशांत सर्वाधिक क्षेत्रीय नुकसान झाले. यात सर्वच घसरणीच्या स्थरावर होते. रुपयातील घसरणीचाही बाजारावर परिणाम झाला. भारतीय रुपया 12 पैसे घसरला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 71.46 च्या स्तरावर स्थिरावला.

जागतिक बाजारातील बहुतांश शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. जपानचा निक्केई 2 टक्क्यांनी घसरला, जी पाच महिन्यामध्ये एक दिवसाची सर्वाधिक मोठी घसरण आहे. अमेरिकेचा एस अँड पी मिनी फ्यूचर 1 टक्क्यांनी घसरला. युरोपीय बाजारातही नकारात्मक परिस्थिती पाहायला मिळाली.

Advertisement
Tags :
×

.