केकेआर-सीएसके आज आमनेसामने
वृत्तसंस्था/ चेन्नई
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना आज सोमवारी येथे कोलकाता नाईट रायडर्सशी होणार असून यावेळी त्यांना त्यांच्या आघाडीच्या फळीकडून आणखी खूप अपेक्षा असतील. आपली मोहीम पुन्हा ऊळावर आणण्याचेही सीएसकेचे लक्ष्य राहील.
लागोपाठ झालेल्या पराभवांमुळे सीएसके ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यासारखी परिस्थिती नसली, तरी संघ व्यवस्थापन त्रुटी दूर करून पुढील वाटचाल करण्यास उत्सुक असेल. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांना पॉवरप्लेमध्ये सीएसकेला आवश्यक ती सुऊवात करून देण्यासाठी त्यांचा खेळ आणखी सुधारणे आवश्यक आहे. गायकवाडने 118.91 या स्ट्राइक-रेटने फटकेबाजी केलेली आहे, तर रवींद्रला मागील दोन सामन्यांत फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही.
सीएसकेचा सर्वांत जास्त धावा करणारा खेळाडू शिवम दुबे आहे. त्याने 160.86 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने 148 धावा केल्या आहेत. युवा समीर रिझवीला संघात परत आणले जाते का हे पाहावे लागेल. या 20 वर्षीय फलंदाजाने गुजरात टायटन्सविऊद्ध 6 चेंडूंत 14 धावा काढून आपल्या खेळाची झलक दाखविली होती. परंतु त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध तो शून्यावर बाद झाल्याने त्याला सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले.
वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रेहमान आणि मथीशा पाथिराना यांना वेगवेगळ्या कारणामुळे मागील सामना हुकला. त्यातून सीएसकेच्या माऱ्यातील अडचणी उघड झाल्या आहेत. ते ‘केकेआर’विरुद्धही अनुपलब्ध राहिल्यास चेन्नईला त्यांची उणीव भरून काढण्यासाठी वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळे दीपक चहर, तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांच्यासह फिरकीपटू मोईन अली, रवींद्र जडेजा आणि महीश थीक्षाना यांच्यावर वाढीव जबाबदारी असेल.
राजस्थान रॉयल्सप्रमाणे स्पर्धेत अपराजित राहिलेल्या केकेआरने दाखविलेल्या निर्भय दृष्टिकोनाचा त्यांना भरपूर फयदा झालेला आहे. सुनील नरेनला पुन्हा सलामी पाठविणे हा मास्टर स्ट्रोक ठरला आहे. सध्या संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनलेला नरेन सीएसकेच्या गोलंदाजांना त्रास देण्याची शक्यता आहे. त्याचा सलामीचा जोडीदार फिल सॉल्ट यानेही चांगली मदत केली आहे.
कर्णधार श्रेयस अय्यर आणि रमणदीप सिंग यांचा समावेश असलेल्या मधल्या फळीने मात्र अधिक सातत्य दाखवण्याची गरज आहे, तर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘केकेआर’ची आतापर्यंतची गोलंदाजीही प्रभावी राहिली आहे, ज्यामध्ये हर्षित राणा, रसेल आणि वैभव अरोरा यांचेही योगदान दिसले आहे. मिचेल स्टार्क व वऊण चक्रवर्ती यांना सुऊवातीच्या दोन सामन्यांतील खराब प्रदर्शनानंतर हळूहळू लय सापडू लागली आहे.
संघ : चेन्नई सुपर किंग्ज-ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आर. एस. हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिचेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रेहमान, मथीशा पथीराना, सिमरजित सिंग, प्रशांत सोळंकी, शार्दुल ठाकुर, महीश थीक्षाना आणि समीर रिझवी.
कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रेहमान.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.