महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅपजेमिनी 60 हजार जणांची भरती करणार

07:00 AM Mar 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मागच्या वर्षापेक्षा यंदा जास्त भरतीः कंपनीत 3 लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत

Advertisement

वृत्तसंस्था /बेंगळूर

Advertisement

फ्रान्समधील आयटी क्षेत्रातील कंपनी कॅपजेमिनी या वर्षभरामध्ये भारतात विविध विभागांमध्ये 60 हजार उमेदवारांना भरती करून घेणार आहे. 2021 वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा उमेदवारांची संख्या भरतीत जास्त असणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीचे सीईओ अश्विन यार्दी यांनी सांगितले, की डिजिटल आधारावर जगभरात विविध उपक्रमांची मागणी वाढते आहे. या कारणास्तव डिजिटल क्षेत्रामध्ये प्रशिक्षित तरुणांची गरज भासते आहे. हीच मागणी कंपनी पूर्ण करण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार आहे. जागतिक स्तरावर आमच्याकडे सध्या 3 लाख 25 हजार इतके कर्मचारी काम करतात. यातील निम्मे भारतात काम करतात.

एरिक्सन सोबत भागीदारी

मागच्या वषी कॅपजेमिनीने एरिक्सनसोबत भागीदारी केली होती. या भागीदारींतर्गत भारतामध्ये 5-जी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. सदरच्या प्रयोगशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 5-जी उद्योगाशी संबंधित विविध सेवा देण्यासाठी कॅपजेमिनी एरिक्सन सोबत येत्या काळात प्रयत्न करणार आहे. 2021 मध्ये कॅपजेमिनीने भारतामध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. येणारा काळही कंपनीसाठी चांगला असून नव्या उमेदवारांची मदत महत्त्वाची ठरणार आहे, असेही सीईओ यार्दी यांनी सांगितले.

एचडीएफसीकडून 21 हजार जणांची भरती

दुसरीकडे खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसी यांनी चालू आर्थिक वर्षामध्ये 21 हजार 503 जणांची नव्याने भरती केली आहे. एक वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता भरतीमध्ये 90 टक्के इतकी वाढ केली. वर्षाअखेर कर्मचाऱयांची संख्या 26 हजार करण्याचा विचार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article