For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडाला 2-0 ने नमवून अर्जेंटिना अंतिम फेरीत

06:33 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅनडाला 2 0 ने नमवून अर्जेंटिना अंतिम फेरीत
Advertisement

लायोनेल मेस्सीकडून 109 व्या आंतरराष्ट्रीय गोलाची नोंद

Advertisement

वृत्तसंस्था/ ईस्ट रदरफोर्ड

लायनोले मेस्सीने मंगळवारी रात्री गतविजेत्या अर्जेंटिनाने कॅनडावर 2-0 ने मिळविलेल्या विजयाचे नेतृत्व करताना आपला 109 वा आंतरराष्ट्रीय गोल आणि यंदाच्या कोपा अमेरिका स्पर्धेतील पहिला गोल केला. या विजयासरशी अर्जेटिना कोपा अमेरिका फायनलमध्ये पोहोचला आहे.

Advertisement

22 व्या मिनिटाला ज्युलिन लव्हारेझने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली आणि 51 व्या मिनिटाला एन्झो फर्नांडेझचा गोलरक्षक मॅक्सिम क्रेप्यूच्या चेहऱ्यावर आदळून परत आलेला फटका मेस्सीने जाळ्यात वळवला. मेस्सीने अर्जेंटिनासाठी मागील 25 सामन्यांमध्ये 28 गोल केले आहेत आणि कोपा अमेरिका स्पर्धेत आतापर्यंत 14 गोल केले आहेत. स्पर्धेतील विक्रमापेक्षा तो तीन गोलांनी मागे आहे.

केवळ पोर्तुगालच्या क्रिस्तियानो रोनाल्डोने मेस्सीपेक्षा जास्त म्हणजे 130 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. मेस्सीला 24 जून रोजी 37 वर्षे पूर्ण झालेली आहेत. इराणच्या अल दाईने 1993 ते 2006 या कालावधीत 108 किंवा 109 गोल केले होते. 2000 मध्ये इक्वेडोरविऊद्ध त्याने केलेला गोल हा पूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यात झाला होता की नाही यावरून वाद असल्याने त्याच्या गोलांच्या संख्येविषयीही संभ्रम निर्माण झाला आहे.

आपल्या स्वातंत्र्यदिनी मिळविलेल्या विजयासह अर्जेंटिनाने आपली अपराजित राहण्याची मालिका 10 सामन्यांपर्यंत वाढवली आहे. मियामी गार्डन्स, फ्लोरिडा येथे रविवारी अंतिम फेरीत उऊग्वे किंवा कोलंबियाशी सामना करताना अर्जेंटिना विक्रमी 16 वे कोपा अमेरिका जेतेपद मिळविण्याच्या ध्येयाने उतरेल. 2022 च्या विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या जोडीला कोपा अमेरिकाची सलग दोन विजेतेपदे मिळवून अर्जेंटिना स्पेनच्या पराक्रमाची बरोबरी करू पाहत आहे. स्पेनने 2010 च्या विश्वचषकासह 2008 आणि 2012 सालची युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली होती.

Advertisement
Tags :

.