For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुनोमध्ये चित्त्याच्या तीन पिल्लांचा जन्म

06:18 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुनोमध्ये चित्त्याच्या तीन पिल्लांचा जन्म
Advertisement

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

Advertisement

वृत्तसंस्था/ कुनो

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता ‘आशा’ने नुकताच तीन शावकांना जन्म दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चित्ता प्रकल्पाच्या यशाचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सदर व्हिडिओमध्ये चित्त्यांची पिल्ले दिसत आहेत. ‘कुनो नॅशनल पार्कने तीन नवीन सदस्यांचे स्वागत केले आहे. या शावकांचा जन्म ‘आशा’ नामक नामिबियन मादी चित्त्याच्या पोटी झाला आहे’, असे यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच प्रोजेक्ट चित्तामध्ये सहभागी असलेल्या कुनो वन्यजीव विभागातील सर्व तज्ञ आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करत कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांची तीन पिल्लू जन्मल्याची अत्यंत आनंददायी बातमी सर्वदूर केली आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले होते. या माध्यमातून देशात प्रोजेक्ट चित्ता सुरू करण्यात आला होता. यापूर्वी मार्च 2023 मध्ये ज्वाला नावाच्या मादी चित्त्याने चार शावकांना जन्म दिला होता. परंतु त्यापैकी फक्त एकच जिवंत राहिले होते. त्या चित्त्यालाही नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.