For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसची ‘नारी न्याय’ हमी योजना

11:58 PM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसची ‘नारी न्याय’ हमी योजना
Advertisement

गरीब महिलांना वार्षिक एक लाख रुपये मदत, सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाचे आश्वासन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली:

देशात लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस जनतेला आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. काँग्रेस पक्षाने बुधवारी ‘नारी न्याय’ हमी योजना जाहीर केली. याअंतर्गत महिलांसाठी पाच हमींच्या माध्यमातून देशातील महिलांसाठी नवा अजेंडा ठरवला आहे. आपले सरकार स्थापन झाल्यास महिलांसाठी ‘पंचहमीं’ची अंमलबजावणी करू, असे आश्वासन काँग्रेसने  दिले आहे.

Advertisement

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘नारी न्याय’ हमी अंतर्गत 5 घोषणा केल्या असून त्यात महालक्ष्मी हमी, अर्धी लोकसंख्या-पूर्ण हक्क, महिला शक्ती सन्मान, अधिकार मैत्री, सावित्रीबाई फुले वसतिगृह आदींचा समावेश आहे. महालक्ष्मी हमी योजनेनुसार गरीब कुटुंबातील प्रत्येक महिलेला वार्षिक 1 लाख ऊपयांची मदत दिली जाईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने निम्म्या लोकसंख्येला खूष करण्याचा प्रयत्न केला आहे.

सत्तेत येण्याच्या आशेने काँग्रेसने गरीब महिला, आशा, अंगणवाडी, माध्यान्ह भोजन कर्मचारी तसेच नोकरदार महिलांसाठी योजना तयार केली आहे. याशिवाय गावातील महिलांमध्ये कायद्याच्या जागृतीबाबतही महिला मैत्रीची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये महिलांची संख्या निम्मी आहे, मात्र गेल्या 10 वर्षांत त्यांना काहीही मिळालेले नाही. त्यांच्या नावावर राजकारण करायचे आणि त्यांच्याकडून मते मिळवायची एवढंच काम झालंय... काँग्रेसने आज ‘महिला न्याय हमी’ची घोषणा केली. याअंतर्गत पक्ष देशातील महिलांसाठी नवा अजेंडा ठरवणार असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

‘नारी न्याय’ हमी योजना लॉन्च करताना आमची हमी ही पोकळ आश्वासने आणि विधाने नाहीत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आम्ही जे बोलतो त्यावर ठाम असतो, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. यासोबतच त्यांनी काँग्रेससाठी जनतेकडून आशीर्वादाची मागणी करत लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी या लढ्यात आमचे हात बळकट करा, असे स्पष्ट केले.

काँग्रेसच्या ‘पंच हमी योजना’...

महालक्ष्मी : गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याची योजना काँग्रेसने आखली आहे. याअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेला वर्षाला एक लाख ऊपये दिले जातील.

अर्धी लोकसंख्या-पूर्ण हक्क : याअंतर्गत काँग्रेस सत्तेत आल्यास केंद्र सरकारमधील सर्व नव्या नोकरभरतींपैकी निम्म्या म्हणजेच 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

महिला  शक्ती सन्मान : आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका तसेच माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या महिलांना ‘शक्ती सन्मान’ अंतर्गत मासिक वेतनात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट करणार.

अधिकार मैत्री : ‘अधिकार मैत्री’ अंतर्गत प्रत्येक पंचायतीमध्ये एक महिला अधिकारी नियुक्त करण्यात येईल. तिच्याद्वारे गावातील महिलांना कायदेशीर हक्क आणि अधिकारांची अंमलबजावणी करण्यास मदत केली जाणार.

सावित्रीबाई फुले वसतिगृह

Advertisement

.