For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसकडून लोकसभेची तयारी तीव्र

06:46 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसकडून लोकसभेची तयारी तीव्र
Advertisement

प्रचार समितीची घोषणा : अजय माकन यांच्यावर मोठी जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी तीव्र करत शनिवार, 6 जानेवारी प्रचार समिती स्थापन केली. पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन हे या समितीचे समन्वयक असतील. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांना सदस्य करण्यात आले आहे. दरम्यान, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी एक पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. तसेच विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस देशातील विविध भागात अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे दिसून येते.

Advertisement

काँग्रेस अध्यक्ष मल्लकार्जुन खर्गे यांनी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार समिती स्थापन केली असून त्याचे निमंत्रक पक्षाचे कोषाध्यक्ष असतील. सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक केंद्रीय वॉर रूम देखील तयार करण्यात आला असून कम्युनिकेशन वॉर रूमचे नेतृत्व वैभव वालिया करतील, तर संघटनात्मक वॉर रूमचे नेतृत्व शशिकांत सेंथिल एस. यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पक्षाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. तसेच वऊण संतोष, गोकुळ बुटेल, नवीन शर्मा आणि पॅप्टन अरविंद कुमार हे संघटनात्मक वॉर रूममध्ये उपाध्यक्ष असतील.

यापूर्वी शुक्रवारी काँग्रेसने दिल्लीच्या माजी आमदार अलका लांबा यांची महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. याशिवाय वऊण चौधरी यांना पक्षाची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे प्रमुख करण्यात आले. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा झालेल्या लांबा यांना गेल्यावषी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.