कमी लागणार भूक अन् घटणार वजन
जगभरातील वैज्ञानिक प्रतिदिन एकाहून एक चकित करणाऱ्या तंत्रज्ञानांना विकसित करत आहेत. एक नवा शोध अनेक प्रकारच्या समस्यांवर तोडगा काढणारा आहे. सायन्स या नियतकालिकात प्रकाशित एका लेखात स्मार्ट पिलविषयी माहिती देण्यात आली आहे. व्हायब्रेटिंग इन्जेस्टिबल बायोइलेक्ट्रॉनिक स्टिम्युलेटर-वाईब्सला वेट लॉस तंत्रज्ञानाचे भविष्य ठरविले जात आहे. दाव्यानुसार ही पिल भूक कमी करते.
अद्याप या पिलचे मानवी परीक्षण झालेले नाही. परंतु डुकरांवरील परीक्षणाचे निष्कर्ष आशादायी आहेत. परीक्षणात जवळपास 30 मिनिटांच्या वाईबस अॅक्टिव्हिटीनंतर डुकरांनी पुढील अर्ध्या तासात सुमारे 40 टक्के कमी अन्नग्रहण केले आहे. जाहीरपणे ही पिल पोटातील रिसेप्टर्सना सक्रीय करून भोजनाच्या उपस्थितीला स्टीम्युलेट करून काम करते. या बदल्यात हायपोथॅलेमसला हार्मोनची पातळी वाढविण्याचे सिग्नल देते, जे आम्हाला पोट भरलेले असल्याची जाणीव करून देत असते. हे सर्व काही मानवी परीक्षणाच्या यशानंतरच प्रत्यक्षात उतरणार आहे.
वाइब्स गोळी जेवणाच्या 20-30 मिनिटांपूर्वी रिकामी पोटी घ्यावी, जेणेकरून भोजनाच्या प्रारंभी पोट काही प्रमाणात भरलेले असल्याचे वाटेल. कथितपणे वाईब्स गोळीविषयी एमआयटीच्या माजी विद्यार्थिनी अणि पोस्टडॉक श्रिया श्रीनिवासन यांनी विचार केला होता, त्या सध्या हार्वर्ड विद्यापीठात बायोइंजिनियरिंगच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत. मॅसाच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये असताना त्यांनी वायब्रेशनच्या माध्यमातून पोटाची लाइन तयार करणाऱ्या मॅकेनोरिसेप्टर्सना आर्टिफिशियली खेचत मेंदू आणि पोटादरम्यानचे कनेक्शन नियंत्रित करण्याचा विचार मांडला होता.
आम्ही पोटातील रिसेप्टर्सना वायब्रेशनद्वारे सक्रीय करू शकतो तसेच त्यांना पोट पूर्ण भरल्याची जाणीव करून देऊ शकतो. यामुळे तणावाची एक भ्रामक भावना निर्माण होऊ शकते, जी हार्मोन आणि खाण्याच्या पॅटर्नला नियंत्रित करू शकते श्रीनवास यांनी सांगितले आहे.
व्हिटॅमिनच्या गोळीच्या आकारातील हे वायब्रेटिंग स्टिम्युलेटर एका बंद बॅटरीद्वारे चालतो, तो गोळीच्या चहुबाजूला एक आच्छादन भंग करणाऱ्या गॅस्ट्रिक तरल पदार्थाद्वारे सक्रीय होतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गोळी अन्य गोष्टींप्रमाणे मलासोबत शरीरातून बाहेर पडते. या गोळीची किंमत केवळ 84 रुपयांपर्यंत असणार आहे.