महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कमलनाथांवरून भाजपमध्ये मतभेद

06:22 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शीख दंगलीतील आरोपींना पक्षात घेण्यावर काही नेत्यांचा आक्षेप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मुद्यावरून पक्षात खळबळ उडाली आहे. 1984 शीख दंगलीतील आरोपी कमलनाथ यांना पक्षात घेतल्याने शीख समुदायात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये नुकसान होऊ शकते, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. कमलनाथांच्या भाजपप्रवेशाबाबत पक्षाच्या योग्य व्यासपीठावर आपले विचार मांडल्याचा दावाही संबंधित नेत्यांनी केला आहे. दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनीही कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशासंबंधीचे वृत्त फेटाळून लावले होते.

काँग्रेस नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात असताना आणि लोकसभा निवडणुकीत 370 जागा मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सज्ज होण्यास सांगत असताना पक्षात काही मुद्यांवर मतभेद सुरू झाले आहेत. याचदरम्यान, दिल्लीचे भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी माजी खासदार कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची बातमी पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून ही निव्वळ अफवा असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘1984 शीख दंगलीचे आरोपी कमलनाथ यांना पक्षात स्थान नाही. कमलनाथ हे 1984 च्या दंगलीतील आरोपी आहेत. त्यांच्याविऊद्ध अनेक साक्षीदार आहेत’, असेही स्पष्ट केले आहे.

Advertisement
Next Article