For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमर्शियल सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त

06:33 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
कमर्शियल सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त
Advertisement

नवीन आर्थिक वर्षारंभी व्यावसायिकांना दिलासा : घरगुती सिलिंडर दर जैसे थे

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी सोमवारपासून व्यावसायिक (कमर्शियल) गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी 1 एप्रिलपासून 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅसचा दर प्रतिसिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त केला. तथापि, घरगुतील गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.

Advertisement

व्यावसायिक गॅसच्या किमतीत कपात केल्यानंतर दिल्लीमध्ये त्याची किंमत 30.50 ऊपयांनी कमी होऊन 1,764.50 ऊपये झाली आहे. यापूर्वी हा दर 1,795 रुपये होता. तर मुंबईत 31.50 रुपयांच्या कपातीमुळे 1,749 रुपयांऐवजी आता केवळ 1,717.50 रुपये मोजावे लागतील. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी कमी होऊन 1,879 रुपये झाली आहे. याशिवाय चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस 1,930 रुपयांना मिळेल.

तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होत आहे.

Advertisement
Tags :

.