कच्चे पोलाद उत्पादन 11.12 कोटी टनावर
स्टील उत्पादन संघटना वर्ल्ड स्टील यांची माहिती : मागील वर्षापेक्षा चीनचे उत्पादनात वृद्धी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कच्चे पोलाद उत्पादन 2019 मध्ये 1.8 टक्क्यांनी वाढून 11.12 कोटी टनाच्या घरात पोहोचले आहे. हाच आकडा 2018 रोजी 10.93 कोटी टन राहिला असल्याची माहिती स्टील उत्पादन संघटना वर्ल्ड स्टील असोसिएशन यांच्याकडून देण्यात आली आहे.
भारताचे कच्चे पोलाद उत्पादन 2019 मध्ये 11.12कोटी टन राहिले होते. जे 2018 च्या तुलनेत 1.8 टक्क्यांनी अधिक प्रमाणात झाले आहे. जागतिक पातळीवरील कच्चे पोलाद उत्पादन 2019 मध्ये 186.99 कोटी टन झाले आहे. याची तुलना 2018 च्या सोबत केल्यास ही वाढ 3.4 टक्क्यांनी अधिक रहिल्याची नोंद केली आहे.
स्टील असोसिएशन यांच्याकडून पुनर्रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे मागील वर्षात आशिया आणि पश्चिम आशिया हा विभाग सोडून जगातील प्रत्येक क्षेत्रातील कच्चे पोलाद उत्पादन घटले असल्याचे स्पष्ट केले आहे. चीनमधील उत्पादन निर्धारित वर्षात 8.3 टक्क्यांनी वाढून 99.63 कोटी टन राहिले आहे.
जागतिक उत्पादनाचा वाटा
जागतिक उत्पादन क्षेत्रात चीनची हिस्सेदारी मागील वर्षात वधारुन 53.3 टक्क्यांवर पोहोचली आहे. या अगोदर 2018 मध्ये 50.9 टक्क्यांवर होती. जपानमधील कच्चे पोलाद उत्पादन निर्धारित वर्षात 9.93 कोटी टनावर राहिल्याची नोंद केली आहे. जे कच्चे पोलाद उत्पादन 2018च्या तुलनेत 4.8 टक्क्यांनी कमी राहिले आहे. अहवालानुसार दक्षिण कोरियाचे पोलाद उत्पादन 7.14 कोटी टन झाले आहे.