महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंगना राणौतचा कणकवली शिवसेनेच्यावतीने निषेध

06:34 AM Sep 07, 2020 IST | Abhijeet Khandekar
कणकवली : कंगना राणौतच्या प्रतिकात्मक पुतळय़ाला जोडे मारत निषेध व्यक्त करताना शिवसेना महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी व शिवसैनिक. अनिकेत उचले
Advertisement

प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन

Advertisement

प्रतिनिधी / कणकवली:

Advertisement

मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी झाली असून मला या ठिकाणी राहण्याची भीती वाटत आहे, अशा आशयाचे वादग्रस्त विधान करणाऱया बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन व पोस्टरला चपलाचा हार घालत कणकवलीत शिवसेनेच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच शिवसैनिकांतर्फे निषेध करण्यात आला.

यावेळी मुर्दाबाद, मुर्दाबाद कंगना मुर्दाबाद, शिवसेनेचा विजय असो...! चले जाव, चले जाव, पाक मे चले जाव...! अशा घोषणा देत कंगनाच्या विरोधात कारवाईची मागणी देखील करण्यात आली. येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या या आंदोलनात महिला जिल्हा संघटक नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शहरप्रमुख शेखर राणे, राजू राणे, नगरसेविका मानसी मुंज, मानसी वाळके, वैदेही गुडेकर, साक्षी आमडोस्कर, संजना कोलते, तृप्ती कोरगावकर, नेहा भोसले, वैजू कांबळे, भास्कर राणे, अनुप वारंग, विलास गुडेकर, ललीत घाडीगावकर, रिमेश चव्हाण, किरण वर्दम, दामू सावंत, संतोष परब, संतोष गुरव, बाळू पारकर, निसार शेख, रुपेश आमडोस्कर, राजन म्हाडगूत, अजित काणेकर, सुरज सुतार, वैभव मालंडकर आदी कार्यकर्ते, सेनेच्या महिला पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱया कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानामुळे सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ज्या मुंबईच्या जीवावर आपलं साम्राज्य उभे केले आणि आता त्याच मुंबईबद्दल असे बेजबाबदारपणे वक्तव्य म्हणजे कृतघ्नपणाचे लक्षण असल्याचे सांगत नीलम सावंत-पालव यांनी निषेध व्यक्त केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article