For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ओप्पो एफ-15’ भारतात दाखल

12:42 AM Jan 17, 2020 IST | Tarun Bharat Portal
‘ओप्पो एफ 15’ भारतात दाखल
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

Advertisement

चिनी कंपनी ओप्पोकडून भारतीय तंत्रज्ञान बाजारात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘ओप्पो एफ-15’ सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसोबत एकच मॉडेल कंपनीने सादर केले आहे. स्मार्टफोनची किंमत 19,990 रुपये ठेवण्यात आली असून यांचे प्री बुकिंग सुरु करण्यात आले आहे. तर 24 जानेवारीला पहिली विक्री होणार आहे. ग्राहकांसाठी ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यावर खरेदी करण्याची सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

टेक्निकल गुरुजी या नावानी प्रसिद्ध असणारे यूटय़ूबर गौरव चौधरी या कंपनीने या फोनचे सादरीकरण केले आहे. अभिनेता रणविजय सिंह आणि कंपनीचे प्रोडक्ट मॅनेंजर जितिन अब्राहम उपस्थित होते. यावेळी ग्राहकांच्या पसंतीस हा स्मार्टफोन उतरणार असल्याचा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.