ओएनजीसीचे प्रमुख राहणार अरुण कुमार सिंग
नवी दिल्ली : तेल उत्खनन आणि विपणन कंपनी बीपीसीएलचे माजी अध्यक्ष अरुण कुमार सिंग हे देशातील सर्वोच्च तेल आणि वायू उत्पादक तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) चे नवीन अध्यक्ष होऊ शकतात. 60 वर्षांपेक्षा जास्त असणाऱया पात्र उमेदवाराच्याच नावाला मान्यता दिली जाते, ते पाहता अरुण कुमार सिंग यांची निवड होणार असे मानले जात आहे.
तेल मंत्रालयाने स्थापन केलेल्या निवड समितीने 27 ऑगस्ट रोजी सहा उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर सिंग यांची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ते गेल्या महिन्यात निवृत्त झाले आणि ऑगस्टमध्ये मुलाखतीपूर्वी त्यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ओएनजीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हे नियमित पद एप्रिल 2021 पासून रिक्त आहे. सिंग यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्यास ते तीन वर्षांसाठी ओएनजीसीचा कार्यभार सांभाळतील. तेल मंत्रालयाने वय-संबंधित परिमाण शिथिल केले होते ज्यानंतर सिंग या पदासाठी पात्र ठरले.