For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओएनजीसीकडे गॅस क्षेत्रासाठी 28 बोली

12:12 AM Jan 24, 2020 IST | Tarun Bharat Portal
ओएनजीसीकडे गॅस क्षेत्रासाठी 28 बोली
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

Advertisement

सरकारी क्षेत्रात कार्यरत असणारी पेट्रोलियम कंपनी ओएनजीसीला 64 लहान आणि सीमांत तेल ऍण्ड गॅस क्षेत्रांतील जवळपास 50 बोली मिळाल्या आहेत. या प्रक्रियेमधून खासगी कंपन्यांचा समावेश करुन उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती अशी आहे, की 17 जानेवारी रोजी समाप्त झालेल्या बोली प्रक्रियेमधील 12 कंपन्यांनी 50 क्षेत्रांसाठी जवळपास 18 बोली लावल्या आहेत.

ओएनजीसीने 64 तेल आणि गॅस क्षेत्रांमध्ये 17 तटवर्ती क्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. या ठिकाणांवर तब्बल 30 कोटी तेल तसेच तेलाच्या बरोबरीत गॅसचा समावेश करण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 14 क्लस्टर मधील 28  बोली दाखल करण्यात आल्या असून यातील 50 तेल आणि गॅस क्षेत्राशी संबंधीत आहेत. तीन क्लस्टरमध्ये कोणत्याही प्रकारची बोली झाली नाही. 

Advertisement

दुगांता ऑईल ऍण्ड गॅस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून चार बोली जमा केल्या आहेत. तर ओडिसा स्टीवडोर्स लिमिटेड, प्रिसर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि उदयन ऑईल सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी तीन-तीन बोली जमा केल्या आहेत.

Advertisement
Tags :

.