For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑगस्टमध्ये होणार जम्मू-काश्मीर निवडणुकीची घोषणा

06:41 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑगस्टमध्ये होणार जम्मू काश्मीर निवडणुकीची घोषणा
Advertisement

तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची शक्यता : आयोगाकडून तयारीला वेग

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक करविण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. आयोग निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता सुरक्षा समवेत अन्य पैलूंचे आकलन करत आहे. तर राजकीय पक्ष स्वत:ची समीकरणे जुळवून आणण्यासाठी धडपड करत आहेत. आयोगाकडून ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे.

Advertisement

सूत्रांनुसार केंद्रशासित प्रदेशात तीन ते चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. सप्टेंबरमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण करत त्याच महिन्याच्या अखेरीस निकाल घोषित केला जाऊ शकतो. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक करविण्याच्या मार्गात सर्वात मोठे आव्हान सुरक्षा व्यवस्थेचे आहे. अलिकडच्या काळात वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. याचा प्रभाव निवडणूक कार्यक्रमावरही दिसून येऊ शकतो.

जम्मू-काश्मीरच्या स्थितीवर सध्या आयोगाकडून नजर ठेवली जात आहे. आयोगाचे पथक निवडणूक सज्जतेवर नजर ठेवून आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या स्थितींचे आकलन देखील आयोगाचे पथक करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी आवश्यक तयारींचा आढावा या पथकाकडून घेतला जात आहे. आयोगाचे पथक अधिकाऱ्यांसोबत मिळून निवडणुकीचे वेळापत्रक तयार करण्यासाठी माहिती जमवित आहे.

सर्वकाही सुरळीत राहिल्यास ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. लोकसभा निवडणुकीदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये मतदानावरून मोठा उत्साह दिसून आला होता. श्रीनगरमध्ये मतदानाने नवा उच्चांक गाठला होता. तर केंद्रशासित प्रदेशातील अन्य मतदारसंघांमध्येही मतदानावरून मोठा उत्साह दिसून आला होता.

नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी समेत जम्मू-काश्मीरमधील प्रादेशिक पक्ष लवकर विधानसभा निवडणूक करविण्याची मागणी करत आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नव्या परिसीमनासोबत 30 सप्टेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश दिले होते.

Advertisement
Tags :

.