For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑक्टोबर 2025 पासून नव्या ट्रकमध्ये एसी केबिन

06:14 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
ऑक्टोबर 2025 पासून  नव्या ट्रकमध्ये एसी केबिन
Advertisement

रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केली अधिसूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील ट्रकची खराब स्थिती पाहता भारत सरकारने सर्व ट्रकमध्ये एसी केबिन अनिवार्य केल्या आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासंबंधी अधिसूचना जारी केली असून ऑक्टोबर 2025 पासून सर्व नवीन ट्रक्समध्ये चालकांसाठी पॅक्टरी-स्थापित एसी केबिन असतील. गेल्या पाच वर्षांत अनेक प्रयत्नांनंतर अखेर सरकारने अंमलबजावणीची तारीख निश्चित केली आहे.

Advertisement

1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित सर्व एन2 आणि एन3 श्रेणीतील ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवली जाईल, असे मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेत म्हटले आहे. वातानुकूलन यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या केबिनची चाचणी अधिसूचित ऑटोमोटिव्ह मानकांनुसार केली जाईल. यामध्ये एन2 आणि एन3 श्रेणीतील व्यावसायिक वाहनांचा समावेश असेल. या मानकांमुळे ट्रक उत्पादकांना एसी सिस्टीमच्या सुसज्ज केबिनसह चेसिस विकण्याचा मार्गही मोकळा होईल. या निर्णयामुळे ट्रकच्या डॅशबोर्डसह एसी केबिनमध्ये बदल करण्याची गरज भासणार आहे. ट्रक उत्पादक कंपन्यांना ते स्वत: बसवावे लागणार असल्यामुळे केबिन बसवण्यासाठी वाहन बॉडी बिल्डर्सची गरज नाहीशी होईल.

एन2 आणि एन3 श्रेणीतील वाहने कोणती?

एन2 श्रेणी : या श्रेणीमध्ये ज्यांचे एकूण वजन 3.5 टनांपेक्षा जास्त आणि 12 टनांपेक्षा कमी आहे अशा अवजड वाहनांचा समावेश होतो.

एन3 श्रेणी : एन3 श्रेणीमध्ये त्या अवजड वाहनांचा समावेश होतो ज्यांचे एकूण वजन 12 टनांपेक्षा जास्त आहे.

Advertisement
Tags :

.