महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये घरांच्या विक्रीत घट

08:41 PM Jan 22, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील नऊ शहरांमधील घरांच्या एकूण विक्रीत ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जवळपास 9 टक्क्यांनी घट होत 60,453 युनिट्वर राहिली आहे. आर्थिक नरमाई आणि पैशांची होणारी उपलब्धता यांच्या संकटामुळे घर विक्रीत घसरण झाल्याची नेंद करण्यात आली आहे.

Advertisement

ऑक्टोबर-डिसेंबर 2019 घरांच्या विक्रीत मागील वर्षांच्या तुलनेत 9 टक्क्यांनी घसरण झाली असल्याची माहिती चौथ्या तिमाही अहवालाच्या आधारे सांगण्यात आले आहे. तर नवीन घरांची पूर्तता करण्यात वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी घसरण झाल्याची नोंद आहे.

आर्थिक संकटामुळे समस्या

आर्थिक संकट आणि अन्य भांडवलांची निर्मितीच्या कमतरतेमुळे घरांच्या विक्रीत मोठी घसरण आली आहे. तर जमीन व्यवहार, त्यांच्याशी संबंधीत काम करणाऱया संस्थाकडून देण्यात आलेल्या माहितीमधून नऊ शहरातील विक्री ऑगस्टर ते डिसेंबर या कालावधीत 30 टक्क्यांनी कमी झाल्याचे सूचित केले आहे.

नाइट प्रँक इंडिया आणि ऍनारॉकचा अहवाल

वरील दोन्ही संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये घरांची विक्रीत 1 ते 5 टक्क्यांनी वृद्धी झाल्याची माहिती सादर केली आहे.

ऑक्टोबर-डिसेंबर

शहर           विक्री(टक्के) वाढ/घसरण           

पुणे            9............ घसरण      

ठाणे-हैदराबाद............ 16            घसरण

बेंगळूर-मुंबई.............. 12-12       घसरण  

चेन्नई(आवास)............ 14            घसरण

कोलकाता    26.......... वाढ

गुरुग्राम       19.......... वाढ

नोएडा        20.......... वाढ

रियल इस्टेटमध्ये सुधारणा?

आम्हाल 2020 मधील व्यवहारात रियल इस्टेट बाजारातील कारभारात सरकारकडून मोठय़ा प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याचे मत प्रॉपइक्विटीचे संस्थापक आणि संचालक समीर जसूजा यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :
# Sales of homes#business#Decrease#nationalnews#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article