महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऐन श्रावणात अभिजितला पिरमाची गोडी

06:48 AM Aug 28, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनेक उत्तमोत्तम गाणी दिलेला गायक अभिजीत कोसंबी आता नवं गाणं घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. पिरमाची गोडी लागलीया.. असे गाण्याचे शब्द असून, नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सप्तसूर म्युझिकच्या युटय़ूब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित झालं. पिरमाची गोडी लागलीया या गाण्याची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे, तर बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. राहुल सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या गाण्याला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे. देव झुंबरे, तेजल जावळकर आणि सुरभी सामंत यांच्यावर हे गाणं चित्रीत झालं आहे. अमोल गोळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. गुरु पाटील आणि महेश किल्लेदार यांनी म्युझिक व्हिडिओचं संकलन केलं आहे.

Advertisement

सारेगमप विजेता अशी ओळख असलेल्या गायक कोसंबीनं आतापर्यंत अनेक म्युझिक अल्बम व काही गाणी स्वतः संगीतबद्धही केली आहेत. मात्र पिरमाची गोडी लागलीया....हे गाणं खूपच वेगळं ठरणार आहे. कोळी बांधव समुद्र व पुन्हा मासेमारीची सुरुवात करून देणारा नारळी पौर्णिमेचा सण यांची सांगड या गाण्यात घालण्यात आली आहे. तसंच त्याला हलका प्रेमाचा पदरही आहे. त्यामुळे पिरमाची गोडी लागलीया.... नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला साद घालेल.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article