एमटीएनएलचे समभाग 9 टक्के वधारले
07:00 AM Apr 08, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : एमटीएनएलच्या समभागांनी गुरुवारी शेअर बाजारामध्ये 9 टक्के इतकी उसळी घेतल्याचे दिसून आले आहे. एकंदर एप्रिल महिन्यामध्ये या समभागाच्या भावामध्ये 26 टक्के इतकी वाढ दिसली आहे. बीएसईवरती गुरुवारी एमटीएनएलचा समभाग 26.8 रुपयांवरती व्यवहार करत होता. केंद्र सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएल यांच्या एकीकरणाला निर्णय लांबणीवर टाकल्याने एमटीएनएलचा समभाग बाजारात वधारल्याचे दिसून आले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article