एनटीपीसी, पॉवर ग्रीडचे समभाग वधारले
07:00 AM Apr 08, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱया एनटीपीसी आणि पॉवर ग्रीड कॉर्प यांच्या समभागांनी शेअर बाजारामध्ये नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. गेल्या पाच दिवसांच्या काळामध्ये समभागांनी 17 टक्के इतकी वाढ दर्शविली आहे.एनटीपीसीचा समभाग 17 टक्के वाढीसह 158 रुपयांवर गुरुवारी व्यवहार करत होता. तर दुसरीकडे पॉवरग्रीड कॉर्पोरेशनचा समभाग 0.4 टक्के वाढून 239 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या पाच सत्रांमध्ये हा समभाग 10 टक्के इतका वाढला.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article