‘एनएचएआय’चा रस्ते कर संकलनाचा विक्रम
एक दिवसांचे संकलन 86.2 कोटी : प्राधिकरण अध्यक्ष संधु यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील रविवारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून (एनएचएआय) 86.2 कोटी रुपयाचे रस्ते कर संकलन झाले असून या आकडेवारीतून एका नव्या विक्रमाची नोंद करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष सुखबीर सिंह संधु यांनी दिली आहे. एक दिवसांच्या कर संकलनामधून विक्रमाची नोंद करणारा हा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती दिली आहे.
रस्ते कर वसूलीसाठी इलेक्ट्रॉनिक प्रणाली फास्टॅगच्या माध्यमातून जानेवारी 2020 मध्ये सर्वाधिक दैनदिन संग्रह 50 कोटी रुपयावर राहिला आहे. या अगोदर नोव्हेंबर 2019 मध्ये एक दिवसाच्या इलेक्ट्रानिक प्रणालीमधून 23 कोटी रुपयाचे कर संकलन झाले होते.
नवी प्रणालीमुळे संकलनात वाढ
मंगळवारी राष्ट्रीय राजमार्ग उत्कृष्टता पुरस्कार समारंभा दरम्यान बोलताना अध्यक्ष संधु यांनी जानेवारी 2020 मध्ये सरासरी 30 लाख प्रतिदिन फास्टॅगचा वापर करुन टोल भरणाऱयांची संख्या वाढत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.