एचडीएफसी बँकेचा नफा 33 टक्क्यांनी वाढला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खासगी क्षेत्रात कार्यरत असणारी एचडीफसी बँकेने आपल्या तिसऱया तिमाहीतील नफा कमाईची आकडेवारी सादर केली आहे. डिसेंबर तिमाहीचा नफा 32.8 टक्क्यांनी वाढून 7,416.5 कोटी रुपयावर राहिला आहे. व्याज आणि बिगर व्याज दोन्हींमिळून हा नफा कमाईचा आकडा सादर केला आहे. मागील वर्षातील समान तिमाहीत बँकेला 5,585.9 कोटी रुपयाचा निव्वळ नफा झाला होता.
बँकेच्या एनपीएमधील वाढ
बँकेचा ग्रॉस एनपीएमधील हलकी वाढ होत एकूण कर्जात 1.42 टक्क्यांवर पोहोचली आहे. मागील व्यापारी वर्षात समान तिमाहीत 1.38 टक्क्यांची वाढ झाली होती. निव्वळ एनपीएत वाढ होऊन 0.48 टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे. यासोबतच बँकेचे प्रोव्हीजन आणि कंटिजेन्सी वाढून 3,043.56 कोटी रुपयावर पोहोचली आहे. जी मागील वर्षात व्यापारी वर्षात समान तिमाहीत 2,211,53 कोटी रुपयावर राहिली होती. यात एकटय़ा एनपीएमधील प्रोव्हीजन 2,883.6 कोटीवर राहिला आहे.
अन्य बाबी
? बँकेचे एकूण उत्पन्न 16.97 टक्क्यांनी वाढून 36,039 कोटीवर
? बँकेचे निव्वळ व्याजातील उत्पन्न 12,576.8 कोटी रुपयांनी वाढून 14,172.9 कोटीच्या घरात पोहोचले आहे.
? बँकेचे कर्ज 19.9 टक्क्यांनी वाढून 9,36,030 कोटी रुपयावर पोहोचले आहे.