For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ऍस्ट्रल पाईप्स’च्या जाहिरातीत आता अभिनेता रणवीर सिंग

08:35 PM Jan 27, 2020 IST | Tarun Bharat Portal
‘ऍस्ट्रल पाईप्स’च्या जाहिरातीत आता अभिनेता रणवीर सिंग
Advertisement

मुंबई

Advertisement

 भारतात पाईपिंग सिस्टिमची सर्वाधिक विश्वसनीय आणि उत्पादनांमध्ये उच्च स्थानावर असलेल्या ऍस्ट्रल पाईप्सने 2020 मध्ये आपली नवी सुरुवात केली आहे. बॉलीवूडचा सर्वात तरुण अभिनेता रणवीर सिंग कंपनीच्या जाहिरातीसाठी करारबद्ध झाला आहे. ऍस्ट्रल पाईप्सशी जोडले गेल्यामुळे आनंद होत असून, आपल्या देशातील पाईपिंग सिस्टिममध्ये श्रेष्ठ उत्पादनापैकी एक आहे. या ब्रँडची अष्टपैलू कामगिरी आणि उद्योग विश्वास नाविन्यपूर्ण असा परिचय हे उत्तम आहे. या ब्रँडशी सामिल होणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे अभिनेता रणवीर सिंग याने सांगितले आहे. पायपिंग विश्वास ऍस्ट्रल पाईप्स नवीनता आणण्यासाठी आणि नवीन ट्रेडसह प्रसिद्ध आहे. ऍस्ट्रल पाईप्सने या उद्योगात बरेच बदल आणले आहेत. रणवीर सिंगसोबत जोडले गेल्यामुळे कंपनीने आपल्या स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. आम्ही उचललेले पाऊल आमच्या ब्रँडला पुढे नेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. कारण आम्हाला आशा आहे की, रणवीर सिंग ब्रँडसाठी एक श्रेष्ठ जोडीदार आहे आणि त्यामुळे ब्रँडला एक नवी ऊर्जा आणि ताजेपणा मिळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.