उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेटची पाळेमुळे खोलवर
लखनौ : उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या धर्मांतर रॅकेट प्रकरणाची पाळेमुळे खोलवर असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी आरोपी असलेला मुफ्ती काझी जहांगिर कासमी या मुस्लीम धर्मगुरूने अनेक हिंदूंवर धर्मांतरासाठी दबाव आणला होता. तसेच प्रलोभने दाखवून आणि गरीबीमुळे निर्माण झालेल्या आगतिकतेचा गैरफायदा उठवत हा धमऊगुरू धर्मांतर करीत होता असे स्पष्ट होत आहे. ईडीने आता या धर्मगुरूच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. या धर्मगुरूला विदेशातून धर्मांतर घडविण्यासाठी पैसा मिळत असल्याचेही दिसून आले आहे. या धर्मगुरूला तसेच त्याचा सहकारी मोहम्मद उमर गौतम यांना दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. हे दोघे मूकबधीर हिंदू मुलामुलींच्या धर्मांतरासाठी प्रयत्नशील होते. या मुलांच्या शारीरीक विकलांगतेचा गैरफायदा घेऊन त्यांना मुस्लीम धर्मात ओढण्याचे त्यांचे कारस्थान होते. मूकबधीर कल्याण संस्थेच्या पडद्याआड या कारवाया चालत असून दिल्लीसह देशात इतरत्रही असे प्रकार घडल्याचे उघड होत आहे