ईपीएफमधील निष्क्रिय खात्यांमध्ये 3930 कोटी जमा
07:00 AM Apr 08, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली माहिती
Advertisement
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
Advertisement
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (ईपीएफ) निष्क्रिय असणाऱया खात्यांमध्ये जवळपास 3930.85 कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सुशील कुमार मोदी यांच्या विचारलेल्या एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये विना दाव्याची कोणतीही रक्कम जमा करण्यात आली नाही. तसेच कर्मचारी भविष्य निधी योजना 1952 नुसार काही खात्यांना निष्क्रिय खात्यांच्या वर्गवारीत रुपांतरीत केले असल्याचेही मंत्री यादव यांनी स्पष्ट केले आहे.
अशा सर्व निष्क्रिय खात्यांना निश्चित रुपामध्ये दावेदार राहिले आहे. 31 मार्च 2021 च्या स्थितीनुसार अशा निष्क्रिय खात्यांमध्ये जमा असणाऱया आकडेवारीचीही यावेळी माहिती दिली आहे.
अन्य बाबी...
- 1 ऑक्टोबर 2020 नंतर यामध्ये 1,44,82,359 नवीन कर्मचाऱयांची भरती केली आहे.
- सर्वाधिक नेंदणीत महाराष्ट्र आहे त्यापाठोपाठ, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आदीचा समावेश आहे.
Advertisement
Next Article