For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंदूरनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का

06:13 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंदूरनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का
Advertisement

लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे. अशा वेळी काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मध्यप्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या मुख्य उमेदवाराने माघार घेतल्याने पक्षाची कोंडी झाली असतानाच याच राज्यातील काँग्रेसचे सहा वेळचे आमदार राहिलेले दिग्गज नेते रामनिवास रावत यांनी काँग्रेसचा त्याग करुन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा आदी उपस्थित होते.

Advertisement

रामनिवास रावत हे काँग्रेसमधील मोठे नेते मानले जात होते. त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने मध्यप्रदेशातील तीन ते चार जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. कोणत्याही कष्टाळू नेत्याला किंवा कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये भवितव्य नाही. पक्षनेतृत्व सातत्याने अशा लोकांकडे दुर्लक्ष करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. आम्ही त्यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे, असे रावत यांनी पक्षप्रवेशानंतर स्पष्ट केले आहे.

भाजपचे धमकाविण्याचे तंत्र

Advertisement

काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाकडून धमकाविले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते शैलेद्र पटेल यांनी केला. या पक्षाकडून लोकशाहीची हत्या केली जात आहे. विरोधी पक्ष संपविण्याचा कट या पक्षाने रचला आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षांतरे होत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement
Tags :

.