For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आर.पी.डीत भरली चिमुकल्यांची रंगभरण स्पर्धा

04:42 PM Oct 13, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आर पी डीत भरली चिमुकल्यांची रंगभरण स्पर्धा
Advertisement

आंबोली सैनिक स्कूल, पी.एफ डॉन्टस फाउंडेशन, सावंतवाडी नगर परिषद व सावंतवाडी पत्रकार संघ यांचे आयोजन

Advertisement

सावंतवाडी - प्रतिनिधी 

आज दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 3.30 वाजता सैनिक स्कूल आंबोली , पी.एफ.डाॅन्टस फाऊंडेशन , सावंतवाडी नगरपरिषद व सावंतवाडी पत्रकार संघ यांच्यावतीने सावंतवाडी आर. पी. डी हायस्कूलच्या प्रांगणात रंगभरण आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सैनिक पतसंस्थेचे संचालक जॉय डॉन्टस, आरपीडीचे प्राचार्य .जगदीश धोंड , आंबोली सैनिक स्कूलचे दीपक राऊळ, बाबुराव मालवणकर, प्रा. दशरथ सांगळे, बाबुराव कविटकर, दीप्ती सावंत, ऋषिकेश गावडे, एस .के गावडे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आधी उपस्थित होते.

Advertisement

या स्पर्धेला चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील हॉल चिमुकल्यांच्या आवाजाने गजबजून गेला असून स्पर्धा पूर्ण होताच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.