महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘आप’चे संजय सिंह 6 महिन्यांनी तिहारबाहेर

06:00 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केजरीवालही बाहेर पडतील असा आशावाद व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह बुधवारी रात्री तिहार कारागृहातून बाहेर आले. तिहारमधून बाहेर येताच त्यांनी आप समर्थकांना संबोधित केले. ही उत्सव करण्याची वेळ नसून संघर्ष करण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले. तसेच तुऊंगाचे कुलूप तोडून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह सर्व ‘आप’ नेत्यांची सुटका होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी संजय सिंह यांना जामीन मंजूर केला होता. आपचे खासदार संजय सिंह यांची जामिनावर सुटका करताना कनिष्ठ न्यायालयाने (ट्रायल कोर्ट) काही अटीही घातल्या आहेत. संजय सिंह यांच्या सुटकेपूर्वी त्यांची पत्नी अनिता सिंह हिने 2 लाख ऊपयांचा जामीन बॉण्ड भरला आहे. ट्रायल कोर्टाने ठरवलेल्या अटी व शर्तींनुसार ‘आप’चे खासदार संजय सिंह देश सोडून जाऊ शकत नाहीत. त्यांना पासपोर्ट जमा करावा लागेल व कुठेही जाताना संजय सिंह यांना त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ऑन ठेवावे लागणार आहे. तसेच दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी संजय सिंह यांना कोणतेही भाष्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article