कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजार पांढऱया डागांचा

07:03 AM Jul 26, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पांढरे डाग किंवा कोड हा काही भयानक विकार नाही; परंतु या पांढर्या डागामुळे व्यक्तीच्या दिसण्यात आणि त्याच्या व्यक्तीमत्त्वात फरक पडतो. त्या व्यक्तीकडे समाजाचा  बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्यामुळे ती व्यक्ती तणावाखाली राहते आणि शेवटी मनोरूग्ण होते. पांढर्या डागाविषयी समाजात जेवढे गैरसमज आहेत, तेवढे इतर कोणत्याही आजाराविषयी नाही. या गैरसमजामुळेच कोडपीडित व्यक्ती मनोरूग्ण होते.

Advertisement

शरीरातील त्वचेमध्ये मेलिनोसाईट नावाच्या पेशी असतात. या पेशी ‘पिगमेंट मेलानीन’ पदार्थ निर्माण करतात. या पदार्थांमुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होतो. मेलिनोसाईट पेशींनी आपले काम थांबविल्यास त्वचेवर पांढरे ठिपके तयार होतात. पांढर्या डागाच्या जागेत असलेले केसदेखील पांढरे होतात. जगात या विकाराने साधारणतः 0.5 ते 2 टक्के लोक बाधित आहेत. पांढरे डाग सर्व वयोगटांत आढळतात. विशेषतः 20 वर्षांनंतर हे प्रमाण अधिक आढळते.

Advertisement

विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत या विकाराचे नक्की कारण सापडले नाही. तथापि, आनुवंशिकता, ऑटोइम्यून, सूर्यकिरणे अतिप्रमाणात अंगावर घेणे आणि पर्यावरणात औद्योगिक रसायनांचे सूक्ष्म कण यांमुळे हा विकार होताना दिसतो.

लक्षणे कोणती?

Advertisement
Tags :
#health#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article