अविनाश पंत यांची फेसबुक मार्केटिंग प्रमुख पदी नियुक्ती
03:52 PM Jan 24, 2020 IST | Abhijeet Khandekar
Advertisement
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
Advertisement
फेसबुक कंपनीने मार्केटिंगवर अधिक जोर देताना दिसत आहे. नुकतेच कंपनीने फेसबुक इंडियाच्या मार्केटिंग प्रमुख (विपणन संचालक) पदी अविनाश पंत यांची नियुक्ती केली आहे. शुक्रवारी याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे.
विपणन संचालक हे नवं पद असेल आणि फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सऍपसह फेसबुकच्या मालकिच्या सर्व ऍप्सवरील मार्केटिंगच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल.
Advertisement
पंत या क्षेत्रात 22 वर्ष कार्यरत असून पंत यांनी यापूर्वी नाइकी, कोकाकोला, दी वॉल्ट डिज्नी कंपनी आणि रेडबुल यांसारख्या अनेक कंपन्यांसोबत काम केले आहे.
आयआयएम अहमदाबाद येथून उत्तीर्ण झालेले पंत हे फेसबुकचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अजित मोहन यांना कामासंबंधीचा अहवाल सादर करतील.
Advertisement