For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्फाबेटची प्रथमच 1 ट्रिलियन डॉलर्सवर झेप

08:42 PM Jan 17, 2020 IST | Tarun Bharat Portal
अल्फाबेटची प्रथमच 1 ट्रिलियन डॉलर्सवर झेप
Advertisement

पिचाई सीईओ बनल्यापासून कंपनी 12 टक्क्यांनी नफ्यात

Advertisement

वृत्तसंस्था / कॅलिफोर्निया

गुगल कंपनीची सहयोगी कंपनी असणारी अल्फाबेटचे बाजारीमूल्य प्रथमच 1 ट्रिलियन डॉलरच्या  (71 लाख कोटी रुपये) घरात पोहोचले आहे. कंपनीचे समभागांनी गुरुवारी 0.8 टक्क्यांची तेजी नेंदवत मूल्य वाढले आहे. भारतीय वशांचे असणारे संदुर पिचाई यांनी नुकतीच या कंपनीचे मुख्य कार्यकारी पद स्विकारले आहे. त्यानंतर दिड महिन्यातच कंपनीने 12 टक्क्यांच्या नफ्याची नोंद केली आहे.अल्फाबेटचे समभाग नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2020 मधील 16 दिवसात कंपनीचे समभाग 8 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. सध्या अमेरिकेची चौथी कंपनी ट्रिलियन डॉलरच्या घरात पोहोचली आहे. अशी स्थिती प्रथमच झालेली आहे.  

Advertisement

पिचाई यांनी 4 डिसेंबर रोजी सीईओ पद हाती घेतले आहे. त्याच दिवशी अल्फाबेटने 64 लाख कोटी रुपये मूल्याची कमाई केली होती. अमेरिकेतील अभ्यासकांच्या माहितीनुसार पिचाई यांची सकारात्मक असणारे नेतृत्व कंपनीच्या उच्चांकी कामगिरीला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. यामुळे अल्फाबेटची समभाग किमत वाढली आहे. तर दुसरीकडे कंपनीचा 85 टक्के महसूल गुगलकडून मिळत असल्याचे म्हटले आहे. तर अल्फाबेटच्या समभागाच्या किमतीचे लक्ष वाढविले आहे.

  अमेरिकेच्या पहिल्या पाच
कंपन्या(बाजारी मूल्यात)

कंपनी      बाजारी मूल्य (रुपये)

ऍपल...... 99.4 लाख कोटी

मायक्रोसॉफ्ट       92.3 लाख कोटी

अल्फाबेट. 71.0 लाख कोटी

ऍमेझॉन.. 66.1 लाख कोटी

फेसबुक  44.8 लाख कोटी

Advertisement
Tags :

.