कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्थसंकल्पाकडून रोजगार-उत्पन्न वाढीची अपेक्षा

08:39 PM Jan 22, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इंडिया रेटिंग्स संस्थेच्या अहवालात निरिक्षणे

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

बाजारातील घडामोडींवर संशोधन करणारी कंपनी आणि विविध उत्पन्न वाढीसंदर्भातील विश्लेषण करणारी संस्था इंडिया रेटिंग्स ऍण्ड रिसर्च यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेमधील संथगती आणि भाविष्यातील सरकारकडून करण्यात येणाऱया तरतूदीची विस्तारीत मांडणी केली आहे.

अर्थव्यवस्थेतील असलेली मरगळ दूर होण्यासाठी भविष्यात सरकारला अर्थसंकल्पात विशेष भांडवलाची योजना आखण्याची गरज निर्माण होणार आहे. यामध्ये देशात रोजगारासोबत उत्पन्नात योग्य वाढीची रचना तयार करण्याची गरज असल्याचे अनुमान मांडले आहे.

चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून मांडण्यात आलेल्या आर्थिक विकास दर 5 टक्क्यांवरुन आगामी आर्थिक वर्षात त्यात सुधारणा होत 5.5 टक्क्यांवर जाण्याचे संकेत व्यक्त केले आहेत. परंतु हा प्रवास थोडा खडतर राहणार असल्याचे इंडिया रेटिंगकडून सांगितले
आहे. 

सुधारण्याची अपेक्षा

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आर्थिक सुधारणा होण्याची अपेक्षा विविध क्षेत्रांमधून व्यक्त करण्यात येत आहेत. यामुळे आगामी अर्थसंकल्पातून विशेष अर्थव्यवस्थेला चालना देणाऱया तरतूदी सरकारने मांडण्याची अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

आर्थिक मंदीची कारणे

अर्थव्यवस्थेमध्ये आलेली सुस्ती ही कोणत्याही एका कारणामुळे आलेली नाही तर त्यामध्ये बँकांचे कर्ज, बिगर-बँकिंग आर्थिक कंपन्यांमधील आलेली अचानक घसरण, यामुळे मध्यमवर्गीयाच्या उत्पन्नात आणि बचतीमध्ये आलेली घट यामुळे आर्थिक तेजी गती घेत नसल्याचे निरिक्षण नोंदवले आहे.

आर्थिक मंदीची कारणे

अर्थव्यवस्थेमध्ये आलेली सुस्ती ही कोणत्याही एका कारणामुळे आलेली नाही तर त्यामध्ये बँकांचे कर्ज, बिगर-बँकिंग आर्थिक कंपन्यांमधील आलेली अचानक घसरण, यामुळे मध्यमवर्गीयाच्या उत्पन्नात आणि बचतीमध्ये आलेली घट यामुळे आर्थिक तेजी गती घेत नसल्याचे निरिक्षण नोंदवले आहे.

Advertisement
Tags :
#business#nationalnews#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article