For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमृता राव करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

06:46 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमृता राव करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन
Advertisement

जॉली एलएलबी 3 मध्ये साकारणार भूमिका

Advertisement

सुभाष कपूर यांच्याकडून दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी 3’चे चित्रिकरण सध्या सुरू आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोन्ही कलाकार दिसून येणार आहेत. पहिल्या भागात अर्शदने मुख्य भूमिका साकारली होती. तर दुसऱ्या भागात हुमा कुरैशीसोबत अक्षय कुमारने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. तर दोन्ही चित्रपटांमध्ये सौरभ शुक्ला यांनी न्यायाधीशाची भूमिका पार पाडली होती. आता जॉली एलएलबी 3 या चित्रपटात अमृता रावची एंट्री झाली आहे.

अमृता राव या चित्रपटात अर्शद वारसी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या पत्नीच्या भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानात पार पडले आहे. आता याचे पुढील चित्रिकरण मुंबइंत सुरू असून काही दृश्यं दिल्लीत चित्रित केली जाणार आहेत.

Advertisement

काही काळापूर्वी हा चित्रपट वादात सापडला होता. या चित्रपटाच्या विरोधात अजमेर न्यायालयात तक्रार नोंदविण्यात आली होती. चित्रपटात न्यायालयीन प्रतिष्ठेला मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने चित्रिकरण रोखण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु संबंधित मागणी न्यायालयाने फेटाळल्याने निर्मात्यांना दिलासा मिळाला होता.

Advertisement
Tags :

.